December 3, 2025 8:26 PM | 3rd odi | Cricket

printer

ODI Cricket: विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं दमदार शतक

रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५९ धावांच आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केलं. भारतानं ५० निर्धारित षटकात ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या. त्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या शतकवीरांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १९५ धावांची भागिदारी केली. कोहलीनं १०२, तर ऋतुराजनं १०५ धावा केल्या. के एल राहुलनं नाबाद ६६, तर रविंद्र जडेजानं नाबाद २४ धावांचं योगदान दिल. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.