गृहमंत्री अमित शहा यांनी काल अनिवासी भारतीयांंच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले की, हे पोर्टल परदेशात राहणाऱ्या ५ कोटी भारतीयांना आधुनिक सुरक्षा तसंच सुविधा पुरवणार आहे. या पोर्टलचा लाभ ओसीआय कार्डधारक आणि नव्या वापरकर्त्यांना होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून अनिवासी भारतीयांना आणि ओसिआय कार्डधारकांना चांगली सेवा पुरवली जाईल. या पोर्टलद्वारे नोंदणी करणंही अधिक सोयीस्कर होणार आहे. सध्याचं ओसीआय पोर्टल २०१३ साली तयार करण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पोर्टलचं कौतुक केलं आहे. या पोर्टलमुळे नागरिकांच्या सेवेसाठी डिजिटल प्रशासनाचा हेतू साध्य होणार असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.