ओसीआय कार्डधारकांसाठी कोणतेही नवे बदल केलेले नाही – भारतीय वाणिज्य दूतावास

ओसीआय कार्डधारकांसाठी कोणतेही नवे बदल केले नसल्याचं न्यूयॉर्कमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं अमेरिकेतल्या भारतीय समुदायाला कळवलं आहे. ओसीआय कार्डधारकांवर बंधनं आणल्याचा दावा करणारं वृत्त दूतावासानं समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे फेटाळलं आहे. ओसीआय कार्डधारकांना ४ मार्च २०२१ च्या अधिसूचनेद्वारे दिलेले अधिकार कायम असल्याचं दूतावासानं स्पष्ट केलं.