डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. भाजपाच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान झालं होतं.