न्यूझीलंडच्या टोंगारिरो राष्ट्रीय उद्यानात कालपासून लागलेल्या आगीत आतापर्यंत १६ शे हेक्टर क्षेत्रावरची वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. विमानं, हेलिकॉप्टर आणि जमिनीवरून पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप समजलं नसल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं.
टोंगारिरो, हे न्यूझीलंडचं पाहिलं राष्ट्रीय उद्यान असून, ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलं आहे. नैसर्गिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे त्याचा समावेश युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.