January 18, 2026 7:37 PM | NTA

printer

राष्ट्रीय चाचणी संस्थेचं यंदाच्या जेईई (मुख्य) सत्र- १ या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रकं जारी

एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं यंदाच्या जेईई (मुख्य) सत्र- १ या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रकं जारी केली आहेत. या महिन्याच्या २१ ते २४ तारखेदरम्यान बी.ई. अथवा बी.टेकच्या पेपर १ साठी बसणाऱ्या उमेदवारांना एनटीएच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या दोन सत्रांमध्ये होईल.
त्यामुळं उमेदवारांनी प्रवेशपत्रावरचा क्यूआर कोड आणि बारकोड स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करावी. तसंच ओळख पडताळणीसाठी उमेदवारांनी अर्जात अपलोड केलेलं वैध छायाचित्र ओळखपत्र देखील बाळगावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.