एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युपीएस अर्थात युनिफाइड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता LC 75 अर्थात Life Cycle 75 आणि BLC अर्थात Balanced Life Cycle या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे. आतापर्यंत केवळ खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या. LC 75 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल. ३५ ते ५५ या वयोगटात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी होऊन सरकारी आणि खासगी रोख्यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल. BLC मध्ये ४५ वर्षापर्यंत किमान ५० टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवता येईल. त्यानंतर तिचं प्रमाण कमी होईल आणि रोख्यांमधली गुंतवणूक वाढेल. हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस आणि एनपीएसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होतील, शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय असल्यानं त्यांना अधिक परतावा मिळवता येईल.
Site Admin | October 25, 2025 1:42 PM
एनपीएस आणि युपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खासगी प्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला
 
		 
									 
									 
									 
									 
									