डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ईशान्य भारत केशराचं केंद्र म्हणून उदयाला येईल-जितेंद्र सिंग

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात ईशान्य भारत एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असून हे क्षेत्र केशराचं  केंद्र म्हणून उदयाला येईल, असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे. सिंग यांच्या हस्ते आज शिलाँग इथल्या ईशान्य भारतासाठीच्या ‘तंत्रज्ञान अनुप्रयोग आणि प्रसार केंद्राचं’ उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  केंद्र सरकारच्या केसर अभियानाअंतर्गत  मेघालय, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात केशराच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून  लवकरच नागालँड आणि मणिपूरमध्येही केशरशेती केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.