उत्तर कोरियाने पूर्वेकडच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे अकराशे किलोमीटर्स चा प्रवास करून जपानच्या अलीकडच्या समुद्रात कोसळल असून या माऱ्यामुळे या क्षेत्रातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याच दक्षिण कोरियाने म्हटलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्या दक्षिण कोरिया भेटीच्या पार्श्वभूमीवर या क्षेपणास्त्र माऱ्याला विशेष महत्व मिळालं आहे.
Site Admin | January 6, 2025 8:14 PM | Norh Korea
उत्तर कोरियाचा पूर्वेकडच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा