उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर केली आहे. काल किम जोंग-उन यांनी ८ हजार ७०० टनांच्या अण्वस्त्र सज्ज, क्षेपणास्त्र पाणबुडीची पाहणी केली होती.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियामध्ये नववी पक्ष काँग्रेस होणार असून त्यापूर्वी संरक्षण क्षेत्रातील आपल्या लष्करी कामगिरीचा आढावा घेण्यासाठी किम जोंग यांनी ही पाहणी केली. त्यांनी जाहीर केलेली शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना ही रशियाला केल्या जाणाऱ्या निर्यातीशी संबंधित असल्याचंही मानलं जात आहे.