नॉर्डिक देशांमध्ये ‘जोहान्स’ या हिवाळी वादळानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंडमध्ये हजारो घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. नॉर्डिक देशांच्या काही भागात विमान, रेल्वे आणि फेरी सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. रस्ते आणि रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. देशाच्या उत्तरेकडच्या भागात जोरदार वादळी वारे वाहतील असा इशारा स्थानिक हवामान विभागानं दिला आहे.
Site Admin | December 28, 2025 8:11 PM | nordic johans
नॉर्डिक देशांमध्ये ‘जोहान्स’ या हिवाळी वादळानं जनजीवन विस्कळीत