६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत. तसंच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्ष २०२३ या वर्षातल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्मपॅम्प्लेट, जिप्सी, नाळ २, रौंदळ, तेरवं, जग्गु आणि ज्युलिएट, भेरा, आशा, झिम्मा २, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना अंतिम फेरीकरता नामांकनं मिळाली आहेत. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर, यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन अमेय भालेराव, उत्कृष्ट छाया लेखन प्रवीण सोनावणे, उत्कृष्ट संकलन अक्षय शिंदे, उत्कृष्ट ध्वनिमुद्रण कुणाल लोळसुरे, उत्कृष्ट ध्वनी संयोजन विकास खंदारे, उत्कृष्ट वेशभूषा मानसी अत्तरदे, उत्कृष्ट रंगभूषा हमीद शेख, मनाली भोसले तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Site Admin | June 27, 2025 4:17 PM | film awards | Maharashtra State Marathi Film Awards
६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर
