नोएडाच्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमित विमानसेवा एप्रिलमध्ये सुरू होईल – राममोहन नायडू

आशियातलं सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर या नॉयडा इथल्या विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्यापासून नियमित हवाई वाहतूक सुरु होईल, असं केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं. आपला देश ही हवाई वाहतूक क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं त्यांनी या संदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. उडान विस्तार योजनेअंतर्गत येत्या १० वर्षांमध्ये १०० नवीन विमानतळं देशभरात सुरु होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.