साहित्यनिर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या विषय कल्पनांवर लिहीणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. २०१५मधे त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कादंबरी, कथा, लघुकथा, निबंध, अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपट तयार झाले. त्यांचं पटकथा लेखनही लास्लो यांनी केलं होतं. सतांतांगो, द मेलांकॉली ऑफ रेझिस्टन्स, द वर्ल्ड गोज ऑन ही त्यांची पुस्तकं आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजली आहेत.
Site Admin | October 9, 2025 7:38 PM | Nobel Prize 2025
नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर