डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 7, 2024 5:49 PM | Nobel Prize 2024

printer

वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकुन या जोडीला जाहीर

यावर्षीचा  वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकुन या संशोधक जोडीला जाहीर झाला आहे. मायक्रो आरएनए आणि जनुकीय हालचालींच्या नियंत्रणात त्याची भूमिका या शोधाबद्दल त्यांना हा ११ लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मिळाला असल्याचं नोबेल पुरस्कार देणाऱ्या कॅरोलिन्स्का इन्स्टीट्यूटने जाहीर केलं. जीवाची वाढ आणि कार्य समजण्यात या शोधामुळे मदत होते. १९०१ पासून देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांचं हे ११५वं वर्ष आहे. भौतिकशास्त्रासाठीचा पुरस्कार उद्या तर रसायनशास्त्रासाठीचा पुरस्कार परवा म्हणजेच येत्या बुधवारी जाहीर होईल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.