२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जुएल मोकीर, फिलिप आगियों आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळं कशारितीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान बाजारात आल्यावर जुन्या गोष्टी बाजारपेठेतून काढून टाकल्या जातात. याविषयावर आगियो आणि हॉविट यांनी लेख लिहिला होता. त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे.
Site Admin | October 13, 2025 8:11 PM | Nobel Prize 2025
२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर