२०२५ साठीचा भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनिस यांना आज जाहीर झाला. एका चिपच्या मदतीनं क्वांटम भौतिकशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांच्या कामामुळे क्वांटम कम्प्यूटर्स, क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी या क्षेत्रांना नवे आयाम मिळाल्याचं द रॉयल स्विडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसनं म्हटलं आहे.
Site Admin | October 7, 2025 6:02 PM | Nobel Prize
भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर
