डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही – जे. पी. नड्डा

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल सांगितलं. पंचकुला इथून 100 दिवसांच्या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल तसंच क्षयरोगाचा विळखा मोडून काढण्यासाठी धोरणबदलासह सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. क्षयरोगाच्या रुग्णांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत असून रुग्णांना महिन्याला हजार रुपये दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि आरोग्य मंत्री कुमारी आरती सिंह राव उपस्थित होते. ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ३४७ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये क्षयरोगाची प्रकरणं शोधणे, उपचारांमध्ये होणारा विलंब कमी करणे आणि विशेषत: उच्च जोखीम असलेल्या गटांमध्ये उपचाराचे परिणाम सुधारणे यावर भर दिला जाईल.