‘नेतुम्बो नंदी नदैतवाह’ यांनी देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून घेतली शपथ

नामिबियामध्ये ‘नेतुम्बो नंदी नदैतवाह’  यांनी देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ७२ वर्षाच्या नंदी यांनी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत ५८ टक्के मतांनी विजय मिळवला. फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष हेंगे गिनगोब यांच्या निधनानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या नागोलो म्बुम्बा यांच्या जागी नंदी नदैतवाह यांची नियुक्ती झाली होती.

 

गिनगोब यांच्या निधनानंतर त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी उपराष्ट्रपती म्हणून बढती देण्यात आली होती. कायदेतज्ञ असलेल्या नंदी १९९० पासून मंत्री म्हणून कार्यरत होत्या. उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी नामिबियाचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं होतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.