डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहार : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ७ नवीन मंत्र्यांचा समावेश

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काल सात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी भाजप कोट्यातल्या सात आमदारांना पाटणा इथं शपथ दिली.

 

या विस्तारामुळं, नितीश कुमार मंत्रिमंडळातील सदस्य संख्या ३६ झाली आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाच सदस्यांना प्रथमच मंत्रीमंडळात संधी मिळाली असून आता भाजपचे २१ तर संयुक्त जनता दलाचे १३ सदस्य आहेत. बिहारमध्ये, एनडीएचे पाच घटक पक्ष आघाडीत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.