संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार आज 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटणा इथं आज सकाळी 11.30 वाजता, ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पाटणा इथं काल झालेल्या युतीतील नवनिर्वाचित आमदारांच्या संयुक्त बैठकीत प्रमुख नितीश कुमार यांची रालोआच्या विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रालोआनं 202 जागा जिंकून विजय मिळवत, सत्ता हस्तगत केली आहे. तत्पूर्वी, भाजप नेते सम्राट चौधरी यांची भाजप पक्ष विधिमंडळ नेते म्हणून, तर विजय सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली.