विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला काहीही संबंध नसून साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तिंनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये हेच आपलं मत आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गडकरी हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. या निवडणुकीत आपला याआधीही सहभाग नव्हता, आताही नाही. मात्र साहित्य संघांच्या लोकांनी निवडणूक न घेता एकमताने अध्यक्ष निवडावा असं आपल्याला वाटतं असं गडकरी म्हणाले.
Site Admin | January 24, 2026 7:15 PM | Minister Nitin Gadkari
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला काहीही संबंध नाही -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी