डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2024 7:15 PM | Minister Nitin Gadkari

printer

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरच्या  दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसंच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचं भूमिपूजन केल्यावर बोलत होते. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी मिळाली, याचा आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचं ते म्हणाले. 

पुणे विमानतळाला संत तुकारामांचं नाव देण्याची मागणी आपण स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करून त्यासाठी पाठपुरावाही करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. पालखी मार्गाचं  काम पूर्ण झाल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला दिलासा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.