January 8, 2026 8:32 PM

printer

अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला २५ हजार रुपये बक्षीस मिळणार

अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता २५ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सदर जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.