राष्ट्रीय पुस्तक न्यास, महाराष्ट्र शासन आणि झीरो माईल युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन केंद्र मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये झालं. रेशीमबाग मैदानावर पुढचे नऊ दिवस हा महोत्सव होणार आहे. उद्घाटन सत्रात वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना, गडकरी म्हणाले की वाचन हे केवळ मनोरंजन नाही तर व्यक्तिमत्व विकासाचाही भाग आहे.
भारत देश हा ज्ञानाचे भांडार आहे आणि देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि परंपरा ही आपली मोठी ताकद आहे. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान पुस्तकं वाचून मिळतं असं ही त्यांनी सांगितलं. या पुस्तक महोत्सवात 300 पेक्षा जास्त प्रकाशक सहभागी झाले असून, या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.