देशाच्या ईशान्य भागातली आठही राज्यं महत्त्वाची असून भाषा आणि संस्कृती वेगळी असूनही या राज्यांनी एकतेचा संदेश दिल्याचं प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथे आयोजित नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह महोत्सवाच्या समारोपावेळी बोलत होते.
आपल्या कार्यकाळात ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये ३ लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची विकासकामं झाली. तसंच, काझीरंगा ते नुमालीगड दरम्यान उन्नत महामार्ग तयार होत असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात संपूर्ण महोत्सवाचे संयोजक तरुण प्रधान आणि बांबू शिल्प कलावंत मुकेश सायकिया यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.