डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा बायोचार हा उत्तम मार्ग- नितीन गडकरी

शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा बायोचार हा उत्तम मार्ग आहे, असं केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ऍग्रोव्हिजन फाऊंडशनने नागपूर इथं आयोजित केलेल्या बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेत ते आज बोलत होते. पिकांचे अवशेष जाळून तयार केलेल्या कोळशासारख्या पदार्थाला बायोचार म्हणतात.

 

बायोचारमुळे मातीचा दर्जा सुधारतो, कार्बनचं प्रमाण वाढतं, आणि प्रदूषण कमी होतं. त्यामुळे खतांचा वापर कमी होतो आणि शेतीतील उत्पादन वाढतं. शेतीमध्ये नवनव्या यंत्रांचा वापर केला आणि उत्पादन वाढलं, तर शेतकऱ्यांना नैराश्य येणार नाही. काळाच्या ओघात शेतकऱ्यांनाच आपल्या विकासाचा मार्ग शोधावा लागेल, असंही गडकरी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.