भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेकडून प्रशंसा

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली इथे नीति आयोगाला श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी निरेखा अमरसुरिया यांनी काल भेट दिली. आयोगाचं कामकाज आणि प्रमाणाधारित धोरणनिर्मिती समजून घेण्यात त्यांनी स्वारस्य दाखवलं. अमरसुरिया यांनी श्रीलंकेचा सुधारणांचा प्रवासही यावेळी उलगडून सांगितला तसंच धोरण समन्वयासाठी नीति आयोगास संस्थांची गरज अधोरेखीत केली. 

 

निती आयोगाचे संचालक सुमन बेरी यांनी यावेळी पीएम गतीशक्ती,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०यासारख्या महत्वाची धोरणे भारताने राबवल्याचं तसंच पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवा उत्साह आणल्याचं सांगितलं. या भेटीदरम्यान भारत- श्रीलंका  द्विपक्षीय संबध, व्यापार, गुंतवणूक तसंच आर्थिक आणि तंत्रज्ञानातल्या सहकार्य कराराबद्दलचं सादरीकरण करण्यात आलं.