नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वलस्थानी

निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे.  निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल निती आयोगाने आज जाहीर केला.  २०२४ या वर्षातल्या डेटावर आधारित या अहवालानुसार  महाराष्ट्रानंतर तामिळनाडू , गुजराथ, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश कर्नाटक आणि पंजाब या राज्याचा नंबर लागतो तर लहान आकाराच्या राज्यांमध्ये उत्तराखंड निर्यातसज्जतेत पहिल्या क्रमांकावर आहे.