नासासोबतच्या इस्रोच्या निसार उपग्रहाचं श्रीहरीकोटाहून यशस्वी उड्डाण

नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार – निसार  उपग्रहाचं उड्डाण आज यशस्वी झालं. आंध्रप्रदेशातल्या  श्रीहरिकोटा इथं सतीश धवन उड्डाण तळावरुन जीएसएलव्ही – एफ सिक्सटीन अग्निबाणाबरोबर संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात झेपावला आणि त्यानंतर १९ मिनिटांनी तो निर्धारित कक्षेत स्थिरावला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. निसार ही अमेरिकेबरोबरची संयुक्त मोहीम असून या उपग्रहाद्वारे पृथ्वीची अधिक स्पष्ट आणि नेमकी छायाचित्रं मिळू शकतील. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री  जितेंद्र सिंह यांनी इसरोच्या पूर्ण  चमूचं अभिनंदन केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.