डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यांना किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नसल्याचं निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण

बँकांमधल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यांना तसंच बचत खात्यांना किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे. त्या काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. किमान शिल्लक रकमेचा नियम न पाळल्याबद्दल विविध बँकांनी खातेदारांना दंड आकारल्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता.