डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिको दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीतारामन ‘टेक लीडर्स’ गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेच्या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय दिग्गजांसह या जागतिक स्तरावरचे अनेक तज्ज्ञ आणि उद्योजक एकत्र येत आहेत.

 

सीतारामन मेक्सिकोचे अर्थमंत्री रोगलिओ रामिरेझ दे लाओ यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार असून संसदीय सहकार्य बळकट करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्या मेक्सिकन संसदेच्या अनेक सदस्यांशीही चर्चा करणार आहेत. त्यानंतर मेक्सिको सिटीमध्ये आयोजित भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत सीतारामन यांचं मुख्य भाषण होणार आहे. या परिषदेत उभय देशातील महत्त्वाच्या उद्योग प्रमुखांचा सहभाग असेल. भारतीय जनसमुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्येही त्या सहभागी होणार आहे.त्यानंतर २० ते २६ तारखेदरम्यान त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेला जाणार आहेत.