डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बँकिंग क्षेत्रात बहुप्रतिक्षित सुधारणा सरकार राबवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार बँकिंग क्षेत्रात बहुप्रतिक्षित सुधारणा राबवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. बँकिंग नियमन सुधारणांची दीर्घ काळापासून गरज होती असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तसंच लोकसभेनं काही सुधारणांसह वित्त विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. बँकांनी आपल्या व्यवहारात कोअर बँकिंगवर लक्ष केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर अर्थमंत्र्यांनी भर दिला. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच उपस्थित उद्योजकांनी अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले. 

ठेवी आणि कर्जांवरचे व्याजदर नियंत्रणमुक्त झाल्याने बँकांना व्याजदर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळाल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. भारताच्या परकीय चलनसाठ्यानं ऐतिहासिक उंची गाठली असल्याची माहिती दास यांनी यावेळी दिली.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.