December 6, 2025 1:37 PM | Nirmala Sitaraman

printer

आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्र सरकार आयकर प्रणाली सुलभ करण्यासाठी काम करत असून यापुढे ती किचकट राहणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका खासगी माध्यम संस्थेच्या कार्यक्रमाला त्या आज संबोधित करत होत्या. नागरिकांच्या प्रगतीसाठी आयकर स्लॅब पारदर्शी आणि सुलभ करणं आवश्यक असून सीमाशुल्क चौकटीत फेरबदल करणं हा याचा पुढचा टप्पा आहे, असं त्या म्हणाल्या. गेल्या दोन वर्षांत सीमाशुल्क कमी करण्यात आल्याचं सीतारामन यानी अधोरेखित केलं. मध्यमवर्गीयांची बचत कमी होत नसून ती गुंतवणुकीत परावर्तीत झाली आहे, असंही त्या म्हणाल्या.