केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सातवी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. २०२६-२७ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी बँकिंग, वित्त सेवा आणि विमा क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीही या बैठकीला उपस्थित होते. अर्थमंत्र्यांनी काल स्टार्ट अप परिसंस्था आणि भांडवली बाजारातील भागधारकांसोबत बैठक घेतली.
Site Admin | November 19, 2025 1:00 PM
अर्थमंत्र्यांनी घेतली आज सातवी अर्थसंकल्पपूर्व बैठक