केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सहावी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. २०२६-२७ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी या बैठकीत कारखानदारी क्षेत्रातल्या तज्ञांशी आणि उद्योजकांशी चर्चा केली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीही या बैठकीला उपस्थित होते. महत्वाच्या धेरणात्मक बाबी, आर्थिक सुधारणा, नवोन्मेषाधारित विकास, गुंतवणुकीच्या संधी आणि आव्हानं इत्यादी मुद्यांवर या बैठकीत व्यापक चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमात म्हटलं आहे.
Site Admin | November 18, 2025 8:10 PM
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सहावी अर्थसंकल्पपूर्व बैठक