डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिका आणि भारत देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची आशा -अर्थमंत्री

अमेरिकेच्या नव्या प्रशासनाशी भारत सक्रीय संवाद साधत असून पुढील पाच ते सहा महिन्यात दोन्ही देशांदरम्यान द्वीपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा सकारात्मक दृष्टीने पूर्ण करण्याची आशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्या विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू करायला सहमती दर्शविली होती.

 

मिशन 500 अंतर्गत उभय देशांतील व्यापार दुपटीपेक्षा जास्त करून तो 500 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचे या कराराचे उद्दीष्ट आहे. या दौऱ्यात सीतारामान अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांची भेट घेणार आहेत. तसंच स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्या बीजभाषण देणार आहेत आणि सॅ फ्रान्सिस्कोमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी गुंतवणूक आणि तांत्रिक प्रगतीवर चर्चा करणार आहेत.

 

तसंच अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये, सीतारमन जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकांना तसंच जी 20 देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरच्या बैठकींना उपस्थित राहतील. त्यानंतर 26 ते 30 एप्रिल दरम्यान पेरूला भेट देणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा