पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी यानं आपला मामा मेहुल चोक्सीसोबत केलेला जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं काल फेटाळला. प्रत्यर्पणाच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत जामिनावर सुटका व्हावी यासाठी नीरव मोदीनं लंडनमधील न्यायालयात धाव घेतली. त्यानं दाखल केलेला हा जामीन अर्ज लंडनच्या किंग्ज बेंच डिव्हिजनच्या उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. त्याच्या जामिनाच्या युक्तिवादाला क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या वकिलांनी कडाडून विरोध केला आणि त्यासाठी लंडनला गेलेल्या भारतीय तपास आणि विधी अधिकाऱ्यांच्या सीबीआय पथकानं त्यांना चांगली मदत केली, असं सीबीआयनं दिल्लीत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | May 16, 2025 9:22 AM | Nirav Modi | UK High Court
हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला
