जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार आहे. जपानची राजधानी टोक्यो इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात नीरजचा सामना डायमंड लीगचा विजेता ज्युलियन वेबर, केशॉर्न वॉलकॉट, जेकब वादलेच आणि भारताचाच सचिन यादव यांच्याशी होईल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी स्पर्धेला सुरुवात होईल. महिला गटात भारताचं प्रतिनिधित्व अन्नू राणी हिच्याकडे आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी उद्या, तर अंतिम फेरी शनिवारी होणार आहे.