छत्तीसगडमधे धमतरी जिल्ह्यात ९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगड राज्यातल्या धमतरी जिल्ह्यात आज ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यात ७ महिला नक्षलवाद्यांचाही  समावेश आहे. छत्तीसगड राज्य सरकारच्या नक्षलवादी पुनर्वसन योजनेच्या प्रेरणेमुळं  आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचं  या नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं. 

   दरम्यान नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या आजच्या घटनेमुळं  छत्तीसगडच्या धमतरी तसंच गरियाबंद जिल्ह्यातल्या नक्षलवाद्यांसह ओडिशाच्या नौपाडा जिल्ह्यातल्या नक्षलवाद्यांचं संपूर्ण उच्चाटन झालं असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.