डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

भारतीय तटरक्षक दलानं एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका केली. हे जहाज पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात गुजरातमधील पोरबंदरच्या पश्चिमेला सुमारे ३११ किलोमीटर अंतरावर बुडालं होतं.

 

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून ते येमेनकडे निघालं होतं, मात्र उसळलेल्या समुद्रामुळे त्यात पाणी शिरल्याने ते बुडालं. मुंबई आणि पाकिस्तानच्या सागरी बचाव समन्वय केंद्रांनी परस्पर सहकार्यातून ही बचाव मोहीम राबवली आणि नऊ जणांचे जीव वाचवले.