November 9, 2025 1:17 PM | IMD weather

printer

भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात होणार २ ते ५ अंश सेल्सिअस घट

देशाचा वायव्य प्रांत आणि मध्य भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअस घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत किमान तापमानात जवळजवळ २ अंश सेल्सिअस घट होईल, तर  राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील  असा अंदाज आहे.

केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि करैकल मध्ये काही ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

दरम्यान, राजधानी दिल्ली आणि परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, आज सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३९१ इतका नोंदवला गेला.