नायजेरियामधे अदामावा राज्यात अचानक आलेल्या पुरात किमान २३ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी समन्वय कार्यालायाने ही माहिती दिली. योला परिसरात आलेल्या या पुरात साडेपाच हजाराहून जास्त लोक बेघर झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि पाण्याचा निचरा करण्याच्या यंत्रणेचा अभाव यामुळे गेल्या मे महिन्यापासून वेगवेगळ्या वेळी आलेल्या पुरात २०० हून जास्त लोक दगावले आहेत.
Site Admin | July 30, 2025 8:35 PM | Nigeria Floods
Nigeria : अचानक आलेल्या पुरात २३ जणांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता