राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४ हजारांपार

भारतीय शेअर बाजारांनी आज पुन्हा विक्रमी पातळी गाठली. व्यवहाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ११४ अंकांची वाढ नोंदवत ८० हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजारांपार गेले.