डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पंजाब आणि हरयाणातील बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित विविध ठिकाणांवर NIA चे छापे

अमृतसरमध्ये एका पोलीस ठाण्यावर काही दिवसांपुर्वी झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणी पंजाब आणि हरयाणातील बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA ने काल छापे टाकले, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. अमृतसर, तरन तारण, फेरोज़पुर, पठाणकोट, कपूरथला, आणि रुपनगर जिल्ह्यात पंजाबमध्ये तसेच हरियाणात सिरसामध्ये 15 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यावेळी, अनेक गुन्ह्यांसाठी वापरात येणारी सामग्री, मोबाइल फोन, डिजिटल उपकरणे, आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आला. गुमताला पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी BKI च्या परदेशात असलेल्या हॅपी पासियनने घेतली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा