हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन त्यासाठी पूर्वतयारी करावी असी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १९ राज्य सरकारे आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे ३ हजार ६३९ मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आहे. विशेषतः दुर्बल समाजघटकांना थंडीच्या तडाख्यापासून संरक्षण देण्याच्या हेतूने मानवाधिकार आयोगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आयोगाला मार्गदर्शकपर सूचना केल्या आहेत.
Site Admin | October 24, 2025 2:53 PM
थंडीची पूर्वतयारी करावी अशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचना