डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2025 3:40 PM | NextGenGST

printer

NextGenGST: जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे.

 

जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेऊ या…

 

नवरात्र किंवा विजयादशमीनिमित्त नवीन वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांना जीएसटी कररचनेतल्या बदलाचा फायदा होणार आहे. नव्या कररचनेनुसार ऑटोमोबाईल क्षेत्रातले जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. दुचाकी आणि लहान कारवरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्यात आला आहे. मोठ्या कारवर ४० टक्के जीएसटी आकारला जाईल मात्र या वाहनावरचा उपकर रद्द करण्यात आला आहे. परवडेल अशा दरात ही वाहनं उपलब्ध होतील. अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी नव्या जीएसटी दररचनेनुसार वाहनांचे नवे दर जाहीर केले आहेत. मारुती सुझुकी या कंपनीने आपल्याकडील विविध कारच्या नव्या किमती जाहीर केल्या असून सणासाठी नव्या ऑफरही दिल्या आहेत. एकूणच या निर्णयामुळे ग्राहक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूने उत्साहाचे वातावरण आहे. 

किमती कमी झाल्यामुळे  नवी वाहनं बाजारात येतील आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना मिळेल. याचा थेट फायदा तरुण, व्यावसायिक आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होणार आहे.