डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी २२ जुलैला पुढील सुनावणी

नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हो मत व्यक्त केलं. पुढची सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.

 

नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. अशा प्रकारच्या परीक्षेत गैरप्रकार घडण्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने पाटणा एम्समधल्या ४ विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.