जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी करांमध्ये सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रांमध्ये दर कमी केल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीत महत्त्वाचा घटक असलेला सायकल उद्योग सुलभ आणि माफक बनवण्याच्या उद्देशाने सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. सायकलवरचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सायकलच्या भागांवरचा जीएसटी दर देखील १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून नवे दर लागू होतील.
Site Admin | September 18, 2025 7:40 PM | Next Gen GST
जीएसटी करकपातीमुळे सायकल उद्योगाला दिलासा