जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि सेवा क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कृत्रिम धाग्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के झाला तर कृत्रिम सुतावरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या दरकपातीमुळे कपड्यांच्या किमती कमी होणार आहेत. अडीच हजारापर्यंतच्या तयार कपड्यावरील जीएसटी ५ टक्के कमी केल्यानं मध्यमवर्गीय आणि गरीब घटकांसाठी वस्त्र खरेदी सुलभ होईल. भारताला जागतिक वस्त्रोद्योग केंद्र बनवण्याच्या दिशेनं देखील एक मोठं पाऊल असल्याचं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं.